Laptop कोणता निवडावा ?
लॅपटॉप विकत घेताना बरेच जणांना कोणता लॅपटॉप घ्यावा कोणता नाही याविषयी संभ्रम असतो.
लॅपटॉप निवडताना महत्वाच्या ५ बाबी लक्षात घ्यावा आणि लॅपटॉप निवडावा
१ तुमचा लॅपटॉप घेण्याचा प्रयोजन आणि बजेट
तुम्ही लॅपटॉप कोणत्या कामासाठी घेता आहात त्यावर कोणती सॉफ्टवेअर वापरणार आहेत या महत्वाच्या बाबी आहेत, त्यानुसार तुम्हाला लॅपटॉप configuration बघावे लागेल
समजा जर तुम्ही एकदा बेसिक युस साठी घेत असाल ज्यावर तुम्ही तुमच्या ऑफिस चे मेल चेक करणार आहात किंवा वर्ड एक्सेल फाईल चे काम करणार आहेत तर अगदी लो बजेट आणि कमी configuration असलेला laptop वर हि सगळी कामे होऊ शकतील
२. लॅपटॉप कोणत्या कंपनी चा घ्यावा ?
लॅपटॉप निवडताना कोणती कंपनी हा सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो, कारण बाजारात बहुतेक लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनी आहेत त्यातून कोणती चांगली आणि दर्जेदार आहे हे कसे शोधावे.
लॅपटॉप कंपनी निवडता महत्वाचा आहे त्या कंपनी ची सर्विस कशी आहे त्या कंपनी चे सर्विस सेंटर कुठे आहे उद्या समजा काही कारणास्तव लॅपटॉप मध्ये बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी तुम्ही कुठे कुठे फिरणार?
म्हणून जे कोणती कंपनी तुम्ही निवडणार आहात त्याची सर्विस सेंटर कुठे आहेत त्याची अगोदर माहिती काढावी.
लॅपटॉप बनवर्या कंपनी मध्ये dell आणि lenovo हे मोठे brand आहेत या कंपनी चे सर्विस सर्व देशभर आहे.
तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करत असाल आणि तिथे तुमचा लॅपटॉप बिघडला तर तो जवळच तुम्हाला सर्विस करून मिळेल. त्याचा शिवाय लॅपटॉप ची बॉडी पार्ट हि quality हि या कंपनी ची खूप चांगले असतात. ते सहसा मोडले जात नाही कारर्ण लॅपटॉप अशी वस्तू आहे जी हाताळताना कधी हि पडू मोडू शकते त्यामुळे बाहेरील लॅपटॉप बॉडी हि उत्तम असावी
३ ऑनलाईन घ्यावा कि बाजारातून घ्यावा ?
सामान्य माणसाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर तो खूप विचार विनिमय करून लॅपटॉप घेतो. कारण लॅपटॉप तो एकदाच घेणार असतो. म्हणून तो घेताना कुठून घयावा हा त्याच्यासाठी खूप मोठा प्रश्न असतो
ऑनलाईन वस्तूंचा खप दिवसेंदिवस वाढत आहेत.त्यातल्या त्यात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट हा कंपनी ग्राहकांना बऱ्याच सूट देत असतात म्हणून ग्राहकांचा ओढ ऑनलाईन बाजाराकडे जास्त असतो.
तरी आपण एकदा लॅपटॉप मॉडेल निवडला असेल आणि तो ऑनलाईन बाजारात उपलब्ध असेल तर तो ऑनलाईन घयावा. कारण सर्वच मॉडेल रेटलेर बाजारात उपलब्ध नसतात.
ऑनलाईन मध्ये आता emi सुविधा हि उपलब्ध असते आणि या सर्व गोष्टी पारदर्शक पाने होतात.
पण जर ती कटकट नको असेल आणि जर तुमचा एकदा लॅपटॉप डिलर चांगला ओळखीचा असेल तर तो त्याच्याकडून घयावा. कारण लॅपटॉप संदर्भात उद्या जर काही जरी समस्या असेल तो तो तुम्हाला सर्विस देणार असेल. काही लॅपटॉप ची ऑन साईट सर्विस असते त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही पर्याय चांगलेच आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच कोणता कॉम्पुटर किंवा लॅपटॉप घेत आहेत तो रिटेलर बाजारातून घ्यावा असा आमचं मत आहे. कारण तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शन केले जाईल तुमचा प्रॉडक्ट संदर्भात .
Comments
Post a Comment