कल्पना चावला - अंतराळवीर

*कल्पना चावला*


*स्मृतिदिन - फेब्रुवारी १ इ.स. २००३*

 

आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी डॉ कल्पना चावला यांचा स्मृति दिन असून १६ वर्षांपूर्वी त्यांच्या कोलंबिया या यानाला पृथ्वीवर परत येत असताना अपघात होऊन दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्यासोबत सहा अंतराळवीरांचा चमू देखील होता त्यांचा देखील या अपघातात दुर्दैवी अंत झाला. कल्पना चावला ह्या जन्माने भारतीय असलेल्या प्रथम महिला आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेल्या दूसरया भारतीय व्यक्ति होत्या. त्यांचा जन्म 1961 मध्ये हरियानामधील करनाल येथे झाला.कल्पना चावला यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल तर आईचे नाव संयोगिता चावला. त्यांच्या वडलांचे औद्योगिक वस्तु निर्मितीचा व्यवसाय होता आणि आई घर सांभाळायची. त्यांच्या आईला आपल्याला मुलगा व्हावा अशी इच्छा होती पण त्यांना कुठे ठावूक होते कि आपली मुलगी संपूर्ण जगात नाव कमावेल! त्यांचे शिक्षण टागोर विद्यालय येथून झाले. 1982 साली त्या अमेरिकेत गेल्या. 1984 साली त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजीनिरिंग ची मास्टर ऑफ़ सायन्स ही पदवी मिळविलि. त्यांना अन्तराळविर होण्याच्या स्वप्नाने असे पछाडले होते की त्या वेळेस झालेल्या च्यालेंजर यान अपघाताची चर्चा देखिल त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्यांनी 1986 मध्ये दूसरी मास्टर पदवी आणि 1988 मध्ये कोलेराडो मधून एरोस्पेस मध्ये डॉक्टरेट मिलविलि. 1988 मध्ये त्यांनी नासातील एम्स रिसर्च सेंटर ओवरसेट मेथड्सच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले. तेथे त्यांनी कोम्प्यूटेशनल फ्लूइड डायनामिक्स मध्ये जागेवरच उभे उड्डाण, कमी अंतरात उड्डाण आणि जमिनीवर उतरणे या विषयांवर संशोधन केले.   त्यानंतर त्यांना ग्लाइडर्स, सीप्लेन्स तसेच एक किंवा अनेक इंजिन असलेली विमाने यांच्या व्यवसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा परवाना मिळाला.1991 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी नासामध्ये अॅस्ट्रॉनॉट कॉर्प्स होण्यासाठी अर्ज केला. त्यांना मार्च 1995 साली तेथे प्रवेश मिळाला. त्यांनंतर त्यांची 1996 मध्ये पहिल्या उड्डानासाठी निवड झाली.  यानात शून्य गुरुत्त्वकर्षणाच्या अवस्थेत असताना  त्या म्हणाल्या "तुमचे अस्तित्व हे तुमच्या हुशारीमुळे असते". त्यांनी अंतराळात 10.67 दशलक्ष किमि प्रवास केला हे अंतर 252 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याएवढे होते.त्यांची पाहिली अंतराळ मोहीम 19 नोव्हेंबर 1997 रोजी चालु झाली. त्या 6 अंतराळविरांच्या चमुचा एक भाग होत्या.व  हा चमु कोलंबिया स्पेस शटल एस.टी.एस 87 चे चालन करत होता.  त्यांच्या पहिल्या मोहिमेत त्या 372 तास अंतराळात होत्या. एस.टी.एस-87 मोहिमेदरम्यान त्यांच्यावर नादुरुस्त असलेला स्पार्टन उपग्रह विंस्टन स्कॉट आणि तकाओं दोई यांच्याबरोबर स्पेसवॉक करुन तो दुरुस्त करने ही जबाबदारी होती. या मोहिमेनंतर त्यांना अंतराळ स्थानकावर काम करायचे होते.चावला यांना 2000 साली त्यांच्या दुसऱ्या उड्डानासाठी एस.टी.एस 107 च्या चमु साठी देखिल निवडण्यात आले होते. परंतु ही मोहीम वारंवार आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लांबलि जात होती. 16 जानेवारी 2003 रोजी चावला दुर्दैवी एस. टी. एस.107 मोहिमेवर जाण्यासाठी कोलंबिया अंतराळ मोहिमेवर आल्या.  चावला यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रयोग करणे ज्यामध्ये ते आणि त्यांच्या चमूला जवळ जवळ 80 प्रयोग करावयाचे असून त्यात पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान निर्मिति, अंतराळविरांचे आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांचा समावेश होता.चावला यांचा मृत्यु 1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळ यान कोलंबियाच्या टेक्सास येथे पृथ्वीच्या वातावरणात पुनरप्रवेश आणि करताना जमिनीवर उतरताना  अपघातात झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व चमूचा त्यात दुर्दैवी अंत झाला.त्यांना मरणोत्तर  कांग्रेशनल स्पेस चे सन्मान पदक, नासा स्पेस फ्लाइट चे पदक तसेच नासा विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. कल्पना चावला यांच्या नावाने आय.एस.यू. शिष्यवृत्ति फंड हा इंटरनॅशनल स्पेस यूनिवर्सिटी (आय.एस.यू.) द्वारा आंतरराष्ट्रीय अंतराळ शिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 2010 साली सुरु करण्यात आला आहे.  द कल्पना चावला मेमोरियल स्कोलरशिप प्रोग्राम भारतीय विद्यार्थी संघटना, टेक्सास विद्यापीठ, अल पासो यांनी 2005 पासून गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुरु केला आहे.'द कल्पना चावला आउटस्टैंडिंग रीसेंट अलुम्नी अवार्ड' हा कोलाराडो विद्यापीठाने जो 1983 पासून दिला जातो त्याचे नामकरण डॉ चावला यांच्या नावाने केले.  करनाल मध्ये चावला यांच्या जन्मगावि 30 हजार शालेय मुले आणि नागरिक यांनी हातात हात धरून 36.4 किमी लांब मानवी साखळी केलि होती. ही साखळी कल्पना चावला यांच्या नावाने शाहरामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे याच्या समर्थनासाठी होती. 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज निर्माण कमिटी' यात वेगवेगळ्या संस्थांचे  स्वयंसेवक आणि कार्यकर्ते तसेच चौतीस शाळांमधील विद्यार्थी यांचा समावेश होता.18 नोव्हेंबर 2013 रोजी राज्य सरकारने पायाभरणी करतानाचा दगड त्यांच्या स्मृति निमित्त रोवण्यात आला.त्यांच्या स्मरणार्थ 51826 या अशनिला त्यांचे नाव देण्यात आले.5 फेब्रुवारी 2003 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी हवामान विषयीच्या उपग्रहाला कल्पना-1 हे नाव दिले. त्यानंतर सोडलेल्या उपग्रहाला कल्पना-2 हे नाव देण्यात आले. हरियाणा सरकारने कल्पना चावला यांच्या नावाने ज्योतिसार,कुरुक्षेत्र येथे प्लेनेटेरियम सुरु केले.नासाने त्यांनी बनविलेल्या सुपर कंप्यूटरला कल्पना चावला यांचे नाव दिले.कल्पना चावला त्यांच्या मित्र आणि सहकर्मी यांच्यात के.सी नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांची आई सांगते कल्पना हि एक वेगळीच मुलगी होती. ती स्व:ताचे केस स्वतःच कापत असे, तीला कधी इस्त्री केलेले कपडे लागत नसत,तिने कराटेचे प्रशिक्षण घेतले होते. त्या पंजाब इंजिनियरिंग कॉलेज मधे अव्वल होत्या त्यांना त्याच कॉलेज ने नोकरी सूध्धा देवू केली होती. त्यांचे भाऊ संजय चावला म्हणतात कि, "माझी बहिण मरण पावलेली नाही तर ती अमर झाली आहे. ती एक आकाशातील कायमचा तारा झालेली आहे आणि तिच्या हक्काच्या जागेवर म्हणजेच आकाशात कायमची राहणार आहे"  त्या या शतकातील काही आदर्शांपैकी एक आहेत त्या सदैव आपल्या नावाशी जणू प्रामाणिकच राहिल्या. त्या आपल्याला त्यांचे धैर्य, जिद्द, चिकाटि, त्यांनी केलेले बलिदान आणि देशाला मिळवून दिलेला अभिमान यासाठी नेहमीच आठवणीत राहतील.डॉ.कल्पना चावला यांच्यापासून प्रेरणा घेऊन २०१३ मध्ये आपल्या नाशिक मध्ये सुद्धा काही खगोलप्रेमी तरुणांनी एकत्र येवून 'कल्पना युथ फाउंडेशन' या नावाची संस्था सुरु केली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करणे. नवीन अंतराळ मोहिमांबद्दल माहिती देणे, शाळा कॉलेजेस यांमधून व्याख्यान आणि प्रस्तुतीकरण करणे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणे. दुर्बीण बनविणे, विविध स्पेस क्राफ्टची मॉडेल्स बनविणे, अंतराळ विज्ञानासंबंधीच्या विषयांवर निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा घेणे, पॉवर पॉइंट स्पर्धा घेणे, आकाशदर्शन करवून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अकाशाबद्दल कुतूहल तयार करणे अशी विविध कामे करते.    युनोच्या आशिया पॅसिफिकच्या अंतराळ शिक्षणाच्या राजदूत अपूर्वा जाखडी ह्या या संस्थेच्या मुख्य सल्लागार असून प्रोफेसर जयदीप शाह, प्रोफेसर भूषण उगले, पवन कदम, हेमंत आढाव, सुशांत राजोळे, दिपक तरवडे, दिपक सोनावणे, धनंजय लाखी हे काम बघतात. तसेच संस्थेची www.kalpanayf.org या नावाने वेबसाईट देखील आहे. तसेच फेसबुकवर देखीलआहे 'कल्पना वाय एफ' या नावाने पेज देखील आहे.


Comments